मुंबई : सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर;,१० कोटींच्या फसवणूकीप्रकरणी १२ जणांना अटक
बनावट कागदपत्र तयार करण्यात मदत केल्याच्या आरोपाखाली सुमारे ६० जणांविरोधात साकीनाका पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

एमएमआरडीए अधिकारी सागर तोरणे(३५) यांच्या तक्रारीवरून ५३ सदनिका धारक व त्यांना बनावट कागदपत्र तयार करण्यात मदत केल्याच्या आरोपाखाली सुमारे ६० जणांविरोधात साकीनाका पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, कुर्ला पश्चिम येथील पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ५७६ प्रकल्प बाधितांनासदनिकांचे वितरणपत्र व चावी वाटप सोमवारी करण्यात आले. त्यापैकी ५३ सदनिका लाटण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्र सादर केल्याचे एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे लक्षात आले. अखेर याप्रकरणी एमएमआरडीएकडून तक्रार करण्यात आल्यानंतर याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रदिप यादव, राजेश यादव, सुनील यादव, अवधेश यादव, सुदर्शन यादव, नखडु यादव, सुभाष यादव, कुणाल घोलप, आकाश भोसले व मोहम्मद तौफीक सय्यद यांना अटक केली. आरोपींसह ४८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी १० कोटी ६ लाख रुपयांची सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या