अल्पवयीन मुलीच्या हत्येनं शहरात खळबळ

आपल्या मुलांचं भलं व्हावं असं सर्व पालकांना वाटतं, त्यासाठी प्रसंगी ते कठोरही वागतात. पण काही वेळा हाच कठोरपणा जीवघेणाही ठरू शकतो. अशीच धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे. तेथे एका अल्पवयीन मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला
आपल्या मुलांचं भलं व्हावं असं सर्व पालकांना वाटतं, त्यासाठी प्रसंगी ते कठोरही वागतात. पण काही वेळा हाच कठोरपणा जीवघेणाही ठरू शकतो. अशीच धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे. तेथे एका अल्पवयीन मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. पोलिसांना या गोष्टीची कुणकुण लागताच त्यांनी तो मृतदेह बाहेर काढून खुनाचा तपास करायला सुरूवात केली. मात्र त्या दरम्यान जी माहिती समोर आली ती ऐकीन सर्वांनाच धक्का बसला. त्या अल्पवयीन मुलीच्या हत्येसाठी दुसरं-तिसरं कोणी जबाबदार नव्हतं, तर खुद्द तिच्या जन्मदात्या पित्यानेच तिचा मारहाण करून जीव घेतल्याचे उघड झाले. हे ऐकून गावकऱ्यांना एकच धक्का बसला, सर्वत्र खळबळ माजली. तीन दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आलं आणि पोलिसांनी चौघांना अटक केली. पण तो नराधम पिता अद्यापही फरार आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील एका गावात ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पीटीआयला माहिती देत सांगितलं की त्या मुलीच्या मृतदेहाची अवस्था पाहून तिची हत्या तीन दिवसांपूर्वी झाली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. त्या मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टम मेदिनीराय मेडिकल कॉलेज रुग्णालयात (एमएमसीएच) पाठवण्यात आला. पोलिस पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघत आहेत.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या