अमरावती हादरलं
पशूधन विकास अधिकाऱ्यानं केली बँक अधिकारी पत्नीची हत्या
आधी डोक्यात वार अन् नंतर मृतदेह फासावर लटकवला
समोर आलेल्या माहितीनुसार,दीप्ती सोळंके या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी होत्या तर पती चेतन सोळंके हा पशुसंवर्धन विकास अधिकारी होता. पती चेतनला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्याने डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करत पत्नीची निर्घृण हत्या केली
पशुधन विकास अधिकाऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. चेतन सोळंके असं आरोपीचं नाव आहे तर दीप्ती चेतन सोळंके वय 35 वर्ष असं मृत महिलेचं नाव आहे. शहरातील अर्जुननगर येथील स्नेहा कॉलरीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चारित्र्यावर संशय घेत चेतनने आपल्या पत्नीची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दीप्ती या देखील बँक अधिकारी होत्या. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार दीप्ती चेतन सोळंके या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी पदावर होत्या. तर आरोपी चेतन सोळंके हा पशुधन विकास अधिकारी आहे. त्याने दीप्ती यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.