देशी दारू सहा दोन आरोपी ताब्यात ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी मुबीन शेख सिरजगांव कसबा
दि.२३.०५.२०२४

 

शिरजगाव कसबा पोलिसांची धडक कार्यवाही

शिरजगांव कसबा. अमरावती ग्रामीण जिल्ह्यात येणारे चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरून दिनांक २१ मे मंगळवार रोजी ९.०० वाजताचे सुमारास मिळालेल्या गोपनिय बातमीवरून शिरजगाव कसबा ते थुगाव पिपरी कडे जाणा-या रोडवर नाकाबंदी करून आरोपी श्रीकृष्ण केवजी बोरवार वय ५७ वर्ष व अंकुश पुरूषोत्तम बोरवार वय २८ वर्ष दोन्ही रा निभोंरा ता चांदुर बाजार यांचे ताब्यातुन ४० नग देशी दारू बॉटल प्रत्येकी १८० एम एल च्या एकुन किंमत ४,००० रूपये व दारू वाहतुक करण्यासाठी उपयोगात आणलेली हिरो होंन्डा शाईन मोटर सायकल क्रमांक एम एच २७ सि क्यु २९६२ किमंत ७५,००० रू असा एकुन ७९,००० रूपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन सदर बाबत पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा येथे अपराध क्र १८७/२०२४ कलम ६५ (अ), (ई) ८१ महाराष्ट्र दारूबंदी अधिनीयम कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास शिरजगाव कसबा पोलीस करीत आहे.

सदरची कार्यवाही . पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर अतुलकुमार नवगिरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेद्र गवई ठाणेदार शिरजगाव कसबा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश धाकडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश आठवले, मिलींद इंगोले, मोहित चौधरी, दिपक गवई, वैभव माडवगणे , विनीत क्षिरसागर यांनी केली.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या