स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांची धडक कार्यवाही
प्रतिनिधी मुबीन शेख
दि.१८.०२.२०२४
*२ किलो गांजा सह आरोपी ताब्यात*
*स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांची धडक कार्यवाही*
चिखलदरा.अमरावती जिल्हयाचे पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात अवैधरित्या विनापरवाना मादक अमली पदार्थ गांजा (कॅनाबीज) बाळगणा-याविरूध्द कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने दि.१६ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोलीस स्टेशन चिखलदरा हददीत गस्त करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन चिखलदरा हदिदत ग्राम सोमवारखेडा येथे राहणारा आरोपी अजय मोतीलाल बेठे वय २६ वर्ष राहणार सोमवारखेडा ता. चिखलदरा हा गांजा अवैधरित्या विकीकरीता त्याचे घरी बाळगुन आहे
प्राप्त माहितीची शहानिशा करुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे राजपत्रित अधिकारी, पंच व पोलीस स्टाफ सह ग्राम सोमवारखेडा येथे जावुन अजय बेठे याचे घराची अमली पदार्थ गांजा बाबत रितसर झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन ०२ किलो ८०८ ग्रॅम मादक अमली पदार्थ गांजा (कॅनाबीज) किं. 14,040 रू चा मुददेमाल मिळुन आला
आरोपीविरूध्द पोलिस स्टेशन चिखलदरा येथे कलम ८ (क),२० एन.डी.पि.एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी यास पुढिल कार्यवाही करिता पोलीस स्टेशन चिखलदरा यांचे ताब्यात देण्यात आले यानंतर सुध्दा जिल्हयात अवैधरित्या गांजा अमली पदार्थ बाळगणा-या विरुध्द कार्यवाही सत्र सुरूच राहणार आहे.
सदरची कार्यवाही विशाल आनंद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण, पंकज कुमावत अप्पर पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांचे मार्गदर्शनात किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अम.ग्रा. यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्निल तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक हर्षद घुसे यांनी.