पुण्यात तिसऱ्या दिवशी गोळीबार!
पुणे शहरात गेल्या सलग तिसऱ्या दिवशी गोळीबार झाला आहे. पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील भुमकर चौकात गुरुवारी पहाटे गोळीबार झाला होता. त्यानंतर येरवडा परिसरात आज गोळीबार झाला.
देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये कोयता गँगनंतर आता गोळीबार करण्याच्या घटना वाढत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरात गोळीबार झाला आहे. तीन दिवसांत चार गोळीबाराच्या घटनांमुळे पुणे शहर हादरले आहे. पुणे गुन्हेगारीच्या घटना वाढल्यामुळे पुणे पोलिसांसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. पुण्यात तीन दिवसांत गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. आता शुक्रवारी पुन्हा गोळीबार झाला आहे. जुन्या वादातून पुणे शहरातील येरवडा परिसरात गोळीबार झाला आहे.जुन्या वादातून सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात गोळीबार झाला आहे. पुण्यातील येरवडा परिसरात आज पहाटे पुन्हा गोळीबार करण्यात आला. जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. आकाश चंदाले याने विकी चंदाले याच्यावर गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येरवडा येथील अग्रेसन स्कूल समोर ही घटना घडली. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते.