जळगावात पुण्यासारखीच घटना, बड्या बापाच्या पोराने चौघांना चिरडलं

जळगावातील रामदेव वाडी जवळ 17 दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला, मात्र असे असतानाही या अपघातातील आरोपींना अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही. मुंबईत उपचार घेत असल्याचं कारण देत आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. विशेष म्हणजे या अपघातग्रस्त कारमध्ये गांजाच्या पुड्या आढळल्या आहेत. यातील दोघा संशयीतांचे ब्लड सॅम्पल 17 दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप मिळाले नाही. या अपघातातील आरेपीमध्ये जळगावतील मोठ्या बिल्डरचा आणि नेत्याचा मुलगा असल्याने पोलीस गप्प बसले का? अशी चर्चा जळगावात आता रंगत आहे.जळगावच्या शिरसोली रोडवरील रामदेव वाडी येथे 17 दिवसांपूर्वी एक भीषण अपघात झाला होता. एक महिला आपली दोन मुलं आणि भाच्याला घेऊन दुचाकीवरून जात असताना एका सुसाट कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रामदेव वाडी गावातील जमावाने अपघातग्रस्त कारमधील दोघांना बाहेर काढले. कारमधील या दोघांनीही नशा केल्याचं दिसून आलं. तर त्यांच्या गाडीत गांजाच्या पुड्या असल्याचेही पोलीस तपासात समोर आले. मात्र 17 दिवस उलटले तरी देखील अद्यापही संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये. यामुळे आता ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या